थर्ड अंपायरच्या चुकीवर भडकला हिटमॅन


भारत विरुद्ध बांगलादेश दुसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने थर्ड अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर त्याला मैदानातच शिवी दिल्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाला 154 धावांचे लक्ष्य दिले होते.

प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशची सुरुवात चांगली झाली, पण नंतर त्यांचे गडी बाद होण्याचे सत्र सुरूच राहिले. राजकोटमध्ये या मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला, यात भारताने आठ गडी राखत विजय मिळविला. रोहित बांगलादेशच्या डावादरम्यान थर्ड अंपायरला शिवीगाळ करताना दिसला. कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.


डावाच्या 13 व्या षटकामध्ये युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर बांगलादेशी फलंदाज सौम्य सरकार मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू चुकला. यानंतर ऋषभ पंतने मागे झालेली चूक सुधारत त्याने ग्लोव्हसला सावधगिरीने स्टंपच्या मागे ठेवत स्टॅम्पिंग केले. पण यावेळी थर्ड अंपायरने पंतच्या चुकीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये पंतचे ग्लोव्हज स्टम्पच्या मागे स्पष्ट दिसत होते आणि सौम्या सरकार आउट होते.

तथापि, थर्ड अंपायरने व्हिडिओ पाहिल्यानंतर चुकून पडद्यावरील नॉट आऊट बटण दाबले. अशा परिस्थितीत रोहितने थर्ड अंपायरचा चुकीचा निर्णय पडद्यावर पाहताच त्याचे हात पडद्यावर उठले आणि व्हिडिओ पाहून हे समजले की तो त्यांना शिवीगाळ करत आहे. मात्र, नंतर पंचांनी आपली चूक सुधारली आणि पडद्यावरील आऊट बटण दाबल्यानंतर सौम्यला बाद केले. या घटनेनंतर रोहितचा हा व्हिडिओ आगीसारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

Leave a Comment