पुणे पोलिसांची डोकेदुखी ठरलेला आणि 175 घरफोडी करणाऱ्या करोडपती आरोपीला अटक


पुणे – तरूण आणि स्मार्ट दिसणारा चोर आजकाल पुणे (महाराष्ट्र) मधील पोलिसांसाठी डोकेदुखी आहे. या चोराबद्दल पुणे पोलिसांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक अलर्ट मेसेज मिळाला, त्यात एक अशीच ओळ होती. मात्र, 19 वर्षांचा हा चोर आता तुरूंगात पोहोचला आहे. ही पोलिसांना दिलासा देणारी बाब आहे. पण त्याला पकडल्यानंतर समोर आलेल्या खुलाश्यामुळे पोलिसांना धक्का बसला आहे.

पैतर सिंह उर्फ पवित्र सिंह ऊर्फ गब्बर सिंह टाक हे त्या चोराचे नाव असून ज्याच्या नावावर गेल्या आठ वर्षांत 175 गुन्हे दाखल आहेत. गब्बर सिंहने पकडल्यानंतर पोलिसांना सांगितले की तो 12 वर्षाचा असल्यापासून चोरी करीत आहे. शाळेत संगणक चोरून त्याने चोरीला सुरुवात केली. पण, पहिल्या चोरीनंतरच त्याला पकडण्यात आले. त्याला शिक्षा म्हणून बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. पण तिथून सुधारण्याऐवजी त्याच्या नावे घरफोडी आणि खटल्यांची संख्या वाढतच गेली.

19 वर्षीय चोर गब्बर सिंह काही दिवसांपूर्वी दागिन्यांच्या दुकानात चोरी करणार होता. परंतु पोलिसांना याची माहिती घटना घडण्यापूर्वीच खबऱ्याच्या मार्फत मिळाली. पोलिसांनी दुकानाभोवती सापळा रचला. जेव्हा गब्बर सिंह आपल्या दोन सहकाऱ्यांसह चोरी करण्यासाठी तेथे पोहोचला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.

अटक केलेल्या गब्बरची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी घरातून 38 किलो चांदी, एक किलो सोने, 13 कार आणि पाच दुचाकी आणि बरेच काही जप्त केले. त्याच्या बँक खात्यातही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा एकूण 86 घटना घडल्या आहेत ज्या एकट्या गब्बर सिंहने केल्या आहेत.

Leave a Comment