अबब ! तब्बल 32 लाखांना विकला गेला दुर्मिळ खेकडा

जापानच्या पश्चिम टोटोरी या भागात बर्फात आढळणारा स्नो क्रॅब (खेकडा) तब्बल 32 लाख 66 हजार रूपयांना विकला गेला. हा जगातील सर्वात महागडा खेकडा आहे. जापानच्या लोक दरवर्षी हिवाळ्या होणाऱ्या सी फूडवर लागणाऱ्या बोलीची वाट पाहत असतात. या लिलावात ट्यूना मासा आणि टरबूजवर देखील बोली लागते.

स्थानिक अधिकारी शोता इनामोनुसार, 1.2 किलो आणि 16.6 सेंटीमीटर लांब खेकड्यावर तब्बल 32 लाखांची बोली लागली. मागील वर्षी खेकड्यासाठी 13 लाखांची बोली लागली होती. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील याची नोंद झाली होती. यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे. यावर्षीच्या विक्रीची नोंद गिनिज रेकॉर्डमध्ये करण्याचा विचार सुरू आहे.

खेकड्याच्या एका स्थानिक विक्रेत्याने सांगितले की, हा खेकडा गिल्टजी गिंजा जिल्ह्यातील एका महागड्या हॉटेलला देण्यात येणार आहे.  स्नो क्रॅब अर्थात खेकडा थंड पाण्यात आढळतो. याचे प्रमाणात अटलांटिक महासागरात अधिक आहे. याचे पाय खूप मोठे असतात. याच्या मांसाचा वापर औषधांसाठी केला जातो. याच वर्षी एका जापानी उद्योगपतीने ट्यूना माशासाठी 22 कोटी दिले होते.