चार वर्षाच्या मुलाला शिव्या दिल्याने ट्रोल झाली स्वरा भास्कर


बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वरा भास्कर ओळखली जाते. विशेष म्हणजे ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या खळबळजनक वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत असते. तिने अलिकडेच एका मुलाखतीत दरम्यान एका चार वर्षांच्या मुलाला शिव्या दिल्याची कबुली दिली. तिला आंटी अशी हाक त्या मुलाने मारली, म्हणून तिने त्याला शिव्या घातल्या होत्या.

स्वरा भास्करला ‘सन ऑफ अबिश’ नावाच्या एका शोमध्ये बोलावण्यात आले होते. तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली? याबाबत या कार्यक्रमात सूत्रसंचालकाने एक प्रश्न विचारला. तिने या प्रश्नाचे उत्तर देताना हा अवाक् करणारा किस्सा सांगितला.

एका जाहिरातीपासून स्वराने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ही साबणाची जाहिरात दाक्षिणात्य भाषेमध्ये तयार झाली होती. स्वरासोबत या जाहिरातीमध्ये एक चार वर्षांचा मुलगा देखील होता. स्वराला बघून त्याने आंटी अशी हाक मारली. हा किस्सा सांगत असताना स्वराने म्हटले की “माझ्या करिअरला सुरूवातही झाली नव्हती आणि या ‘#$%’ (शिवी) मुलाने मला आंटी म्हणून हाक मारली.

मी त्यावेळी पहिल्यांदाच कॅमेरासमोर अभिनय करत असल्यामुळे प्रचंड दबावात होते. त्याला लघुशंका करण्यासाठी जायचे होते. जाहिरातीच्या दिग्दर्शकाला त्याने याबाबत सांगितले. पण त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याने अखेर मला आंटी अशी हाक मारुन याबाबत माहिती दिली. त्याने आंटी म्हणताच मी त्याच्यावर चिडले आणि त्याला शिवी दिली. जाहिरातीसाठी मी घेतलेली मेहनत या घटनेमुळे पाण्यात गेली असेच मला वाटले.

Leave a Comment