‘प्लास्टिक द्या आणि अंडी घेऊन जा’, पर्यावरणासाठी या जिल्हाधिकाऱ्याचे अनोखे अभियान

तेलंगाणामधील कामारेड्डी येथील जिल्हाधिकारी एन सत्यनारायण यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी एका हटके अभियानाची सुरूवात केली आहे. या अभियानांतर्गत 2 किलो प्लास्टिक देणाऱ्याला 6 अंडी मिळणार आहेत. राज्य सरकार देखील सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

प्रशासनानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत, मंडळ आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे अभियान यशस्वी करण्याचे आदेश दिले आङेत. यासाठी अधिकारी, एनजीओ आमि व्यापारी असोसिएशनची एक कमेटी बनविण्यात आली आहे. त्यांना सांगण्यात आले की, अधिक प्रमाणात अंड्यांची व्यवस्था करून ठेवण्यात यावी, जेणेकरून कोणी प्लास्टिक घेऊन आले तर त्यांना त्वरित अंडी देता येतील.

जिल्हाधिकारी एन सत्यानारायण यांनी सांगितले की, या अभियानाला चांगले यश मिळत आहे. मागील तीन महिन्यात तीन नगरपालिकांनी 14900 किग्रा प्लास्टिक जमा केले आहे. त्यांनी सांगितले की, लोकांना या अभियानाशी जोडणे सर्वात अवघड काम होते. त्यामुळे आम्ही वेगळा विचार केला आणि याला लोकांच्या आरोग्याशी जोडले.

 

Leave a Comment