बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पानिपत’चा ट्रेलर अखेर रिलीज


नुकताच आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सेनॉन तर अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त आपल्या समोर येणार आहेत. तर अजय- अतुल यांचे संगीत असलेला हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

कालच अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन आणि संजय दत्त यांचे फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यानंतर चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमधील उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. प्रेक्षक ‘पानिपत’ या ऐतिहासिक महानाट्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी कमालीचे आतुर आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘कोई आपके घरपर हमला बोलेगा, तो आप शत्रूओंकी संख्या गिनोगे? या फिर पुरी ताकद के साथ उनका सामना करोगे?’ अशा एकापेक्षा एक संवादांचा भरणा आहे.

या चित्रपटात मोहनीश बहल, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे यासारख्या बॉलिवूडचा पडदा गाजवणारे दिग्गज कलाकारही पुनरागमन करताना दिसत आहेत. सुहासिनी मुळगावकर, शैलेश दातार अशा मराठमोळ्या कलाकारांचे दर्शनही चित्रपटात घडणार आहे. पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईवर आधारित ‘पानिपत’ हा चित्रपट आहे. मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झाले होते. 1761 मध्ये हरियाणातील पानिपतच्या मैदानावर झालेल्या या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.

Leave a Comment