बीएमडब्ल्यूच्या कार पेक्षाही महाग आहे हा मासा

आज आम्ही तुम्हाला अशा माशाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत बीएमडब्ल्यू कार पेक्षाही अधिक आहे. हो हे खरे आहे. तुम्ही विचार करत असाल की, एक मासा कार पेक्षाही अधिक महाग कसा असू शकतो. मात्र जापानच्या सुकिजी फिश मार्केटमध्ये 200 किलो वजनाच्या ब्लूफिन ट्यूना माशाची तब्बल 1 लाख 17 हजार डॉलरमध्ये विक्री झाली.

भारतीय रूपयांनुसार, या माशाची किंमत जवळपास 77 लाख 92 हजार रूपये आहे. ही किंमत भारतातील बाजारामधील बीएमडब्ल्यूची प्रिमियम एसयूव्ही कार एक्स5 पेक्षाही अधिक आहे.

हा मासा सुशी जेनमाइ रेस्टोरेंटचे अध्यक्ष कियोशी किमुरा यांनी खरेदी केला आहे. मागील वर्षी देखील ट्यूना मासा जवळपास साडे 37 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 23 लाख 78 हजार रूपयांमध्ये विकला गेला होता.

 

Leave a Comment