मधुर बासरी वादनाने ‘या’ पठ्ठ्याने जिंकली सर्वांची मने


‘टॅलेंट’ची आपल्या देशात कोणतीच कमतरता नाही. वेगवेगळे कलागुण आपल्यापैकी प्रत्येकांकडे असतात, जर त्यांना आपली कला दाखवण्यासाठी योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले तर हे लोक कुठच्या कुठे पोहोचू शकतात, पण यातील काहीजणांना दुर्दैवाने ती संधी मिळत ना योग्य व्यासपीठ. त्यामुळे त्यांच्यात असणारे कलागुण मारले जातात. पण आता आपल्याकडे सुदैवाने सोशल मीडियासारखे मोठे व्यासपीठ असल्यामुळे जर एखाद्यामध्ये खरच हटके टॅलेंट असेल तर नेटिझन्स त्या कलाकारांना डोक्यावर चढवल्याशिवाय राहत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या बासरीवादकाने आपल्या मधुर बासरी वादनाने सर्वांची मने जिंकली आहेत. हा बासरीवादक पोटाची खळगी भरण्यासाठी चौकाचौकात बासरी वाजवतो. तो भजनांच्या तालावर बासरी इतकी उत्तम वाजवतो की त्याच्या बासरीतून निघणाऱ्या मधूर आवाजाने सारेच मंत्रमुग्ध होऊन त्याच्याभोवती जमतात आणि कधी त्यांच्या सुरात हरवून जातात त्यांचे त्यांनांही कळत नाही. सोशल मीडियावर सध्या अंगावर फाटकी वस्त्रे, पायात तुटलेल्या चप्पला घालून गल्लोगल्ली बासरी वाजवत फिरणारा या मुरारीच्या बासरीवादनाचे कौतुक होत आहे. ‘द पॉप्युलर इंडियन’ या फेसबुक पेजवरून अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत २ कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.

Leave a Comment