पागलपंतीचे ठुमका गाणे तुमच्या भेटीला


आगामी ‘पागलपंती’ चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या चर्चेत आला आहे. नुकतेच या मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपटातील नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल ठुमका असे असून २ मिनिटे ५ सेकंदाच्या गाण्यामध्ये मल्टीस्टारर जॉन अब्राहम, इलियाना डिक्रुझ, अर्शद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट,आणि कीर्ति खरबंदा डान्स करताना दिसत आहेत.

गणेश आचार्य यांनी ठुमका गाण्याचे कोरियोग्राफ केले आहे. हनी सिंग याने हे गाणे लिहिले आणि गायले देखील आहे. पागलपंती चित्रपटाचा ट्रेलर खूपच कॉमेडी असल्यामुळे प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता अनिल कपूर सुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment