महाराष्ट्र विधानसभाः सोनिया गांधी यांची भेट घेणार शरद पवार


मुंबई – ४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेट घेणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या राज्यात सत्ता स्थापनेच्या विषयाला गती मिळणार असल्याचे बोलले जात असल्यामुळेच ४ नोव्हेंबर रोजी राज्यात सत्ता स्थापनेसाठी एका नवीन राजकीय समिकरणाचा उदय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसनेने भाजपला आपल्याला मुख्यमंत्री पद हवे, ही अट टाकून कोंडीत पकडल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपसोबत कोणत्याही प्रकारच्या चर्चा आणि त्यासाठीच्या प्रस्तावावर भूमिका घेण्यास सेनेने सध्या तरी नकार दिल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मदत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत व काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना सुरूवात झाली आहे. काँग्रेसने याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

राज्यातील सर्व घडामोडींविषयी यावेळी चर्चा झाली. पण जो निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घेतील ते काँग्रेससाठी मान्य असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले असल्यामुळे दिल्लीत झालेल्या या बैठकीत सेनेला पाठिंबा देण्याविषयीचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांच्या उपस्थितीत ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भेटीदरम्यान घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment