देव, अल्लाह, जीसस… तुमचा कोणावरही विश्वास असो, देवाचे नाव घेतल्यावर मनाला शांती मिळते. मात्र परिस्थिती अशी झाली आहे की, एखादा व्यक्ती जर ‘अल्लाह हू अकबर’ म्हणाला तरी आपण सर्व घाबरतो. पॅरिसमध्ये काही दिवसांपुर्वीच अशीच घटना घडली. एका थेअटरमध्ये ‘जोकर’ चित्रपट सुरू असताना एक व्यक्ती अचानक अल्लाह हू अकबर असे ओरडला. पॅरिसच्या ग्रँड रेक्स सिनेमा येथे हा प्रकार घडला.
थेअटरमध्ये सुरू होता ‘जोकर’, एक जण ओरडला ‘अल्लाह हू अकबर’ आणि….
त्या व्यक्तीने ओरडताच थेअटरमधील परिस्थितीच बदलली व लोकांमध्ये गोंधळ उडाला. पुर्ण थेअटर खाली करण्यास सांगण्यात आले.
चित्रपट सुरू होण्याआधी हा व्यक्ती वारंवार ‘हे राजकीय आहे’, असे बोलत होता. आजुबाजूच्या लोकांनी त्याला शांत राहण्यास देखील सांगितले. मात्र को व्यक्ती अचानक आपल्या सीटवर उभा राहून ‘अल्लाह हू अकबर’ ओरडू लागला. ही वाक्य ऐकताच लोकांची धावपळ उडाली.
तो व्यक्ती थेअटरमधून पळून जात असताना पॅरिस पोलिसांनी त्याला पकडले. त्या व्यक्तीचे वय 24 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासणीमध्ये त्या व्यक्तीकडे कोणतेही हत्यार सापडले नाही. बॉम्ब स्कॉड पथकाने देखील संपुर्ण थेअटर तपासले मात्र त्यांना काहीही सापडले नाही.
चौकशी केल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले. एका रिपोर्टनुसार, अल्लाह हू अकबरचा नारा देऊन त्याचा उद्देश लोकांना घाबरवणे हा नव्हता, तर लोकांचे लक्ष्य हटवून त्यांचे सामान चोरी करणे हे होते.
