मुंबई 2050 पर्यंत बुडण्याची शक्यता – रिसर्च स्टडी

एका नवीन संशोधनानुसार, समुद्राचा पातळी आधीच्या अंदाजाच्या तुलनेत 2050 पर्यंत तीन पट अधिक लोकसंख्येवर परिणाम करेल. यामुळे भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पुर्णपणे पाण्याखाली जाऊ शकते.

हे संशोधन न्यू जर्सी येथील ‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या एका विज्ञान संस्थेने केले असून, हा लेख ‘नेचर कम्यूनिकेशन्स’ नावाच्या पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.  हे संशोधन भविष्यातील लोकसंख्या वाढीवर करण्यात आलेले नाही.

रिपोर्टनुसार, लेखकांनी सॅटेलाइट रिडींगच्या आधारावर जमिनीची उंची अधिक योग्य प्रकारे मोजण्याचे तंत्र विकसित केले आहे. यानुसार मोठ्या क्षेत्रात समुद्रात पाण्याची वाढणारी पातळीचा काय परिणाम होतो, हे मोजण्याचे हे मानक आहे. यामध्ये दिसून आले की, आधीच्या अंदाजापेक्षा हे आकडे खूप वेगळे आहेत.

रिसर्चनुसार, 150 मिलियन लोक सध्या या ठिकाणी राहतात व 2050 पर्यंत हे ठिकाणी पाण्याच्या खाली जाईल.  थोडक्यात, 2050 मुंबई पाण्याखाली जाईल, असा अंदाज यात बांधण्यात आला आहे. याआधी देखील अनेक संशोधनात मुंबईतील समुद्र किनाऱ्यावरील पाण्याची पातळी वाढत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment