चीनमध्ये आता उडणार इलेक्ट्रिक विमान

चीनने आपले पहिले 4 सीटर इलेक्ट्रिक विमानाचे यशस्वी परिक्षण पुर्ण केले. मंगळवारी या विमानाने पहिल्यांदा उड्डाण घेतले. या विमानाचे वजन 1200 किलोग्राम असून, लांबी 8.4 मीटर आहे. यामध्ये 13.5 मीटरचे विंग्स आहेत. एकदा फुल चार्ज केल्यानंतर हे विमान 300 किलोमीटरपर्यंत उड्डाण घेते. एकावेळी हे विमान 90 मिनिटे उड्डाण घेऊ शकते.

लाइटवेट कार्बनद्वारे निर्माण करण्यात आलेल्या या विमानाने चीनच्या उत्तरेतील शहर शेन्यांग येथे उड्डाण घेतले. या विमानाच्या पार्ट्समध्ये कार्बन फायबर कंपोजिटचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वसाधारण विमानाच्या तुलनेत या विमानाचे वजन कमी आहे.

या इलेक्ट्रिक विमानांचा व्यावसायिक वापर देखील केला जाऊ शकतो. कारण हे विमान ध्वनी आणि वायू प्रदूषण करत नाही. उबेरने 2023 पासून मेलबर्नमध्ये इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना बनवली आहे. ही सेवा डलास आणि लॉस एंजिल्समध्ये आधीपासूनच देण्यात येत आहे.

Leave a Comment