बिग बजेट ‘महाभारत’मध्ये दीपिका साकारणार ही भूमिका


आजवर विभिन्न भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने प्रेक्षकांना दाखवली. आता लवकरच ती एका बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ‘महाभारत’ या पौराणिक कथेवर आधारित असून भारतीय जनमानसात रुजलेले एक महामिथक म्हणून या कथाकाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता द्रौपदीच्या नजरेतून शेकडो लहान-मोठय़ा व्यक्तिरेखा आणि नानाविध घटनांचा महागोफ उलगडत जाणारे महाभारत पाहायला मिळणार आहे. दीपिका यात द्रौपदीची भूमिका साकारणार आहे.

दीपिका याविषयी म्हणाली, मी द्रौपदी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. बरच काही महाभारतातून शिकायला मिळते. महाभारताला आता एका नव्या दृष्टीकोनातून समजून घेणे खूप माझ्यासाठी औत्सुक्याचे आणि महत्त्वपूर्ण असणार आहे.

दोन भागांत या चित्रपटाला प्रेक्षकांच्या भेटीला आणले जाईल आणि २०२१ साली दिवाळीच्या मुहूर्तावर याचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. मधू मंटेनासह दीपिका या चित्रपटाची सहनिर्माती आहे. चित्रपट निर्माते मंटेना म्हणतात की, द्रौपदीच्या नजरेतून महाभारतासारखे काव्य मोठ्या पडद्यावरून पुन्हा सांगणे मोठी जबाबदारी आहे. जवळपास प्रत्येकाला महाभारताची ओळख आहे. पण आमच्या चित्रपटातून एक वेगळा दृष्टीकोन प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न असेल.

Leave a Comment