खगोलशास्त्रज्ञांनी शोधली ब्रह्मांडामधील सर्वात मोठी आकाशगंगा

खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळात अशा आकाशगंगेचा शोध लावला आहे जी, ब्रह्मांडामधील धुळीच्या ढंगांमध्ये लपलेली आहे. ही आकाशगंगा सुरूवातीच्या ब्रह्मांडापेक्षाही अधिक जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. खगोलशास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, आतापर्यंत शोधण्यात आलेली ही सर्वात मोठी आकाशगंगा आहे. हा शोध नवीन आकाशगंगा शोधण्यासाठी खगोलतज्ञांना प्रोत्साहन देईल.

अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स युनिवर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की, हा शोध आपल्याला ब्रह्मांडामधील काही सर्वात मोठ्या आकाशगंगेबद्दल महत्त्वाची माहिती देतो.

याशिवाय ऑस्ट्रेलियातील स्वाइनबर्ग प्रौद्योगिक युनिवर्सिटीचे संशोधक इवो लाबे यांनी सांगितले की, या आकाशगंगेमध्ये आपल्या मिल्की वे मध्ये असलेल्या ताऱ्यांइतकेच तारे आहेत. मात्र फरक एवढाच आहे की, या ताऱ्यांची गतिशिलता मिल्कि वे पेक्षा अधिक आहे. यासाठी संशोधकांनी अल्मा 66 रेडिओ दुर्बिणीचा वापर केला.

या अभ्यासाच्या मुख्य लेखिका ख्रिस्टिना विलियम्स यांनी सांगितले की, ही एक रहस्यमयी आकाशगंगा आहे. याचा प्रकाश अन्य आकाशगंगेपेक्षा वेगळा आहे. जेव्हा आम्ही पाहिले की, ही आकाशगंगा अन्य तरंगांमध्ये दिसत नाही. त्यावेळी आमचा उत्साह अधिक वाढला. याचा अर्थ आकाशगंगा अंतराळात धुळीच्या ढगांमध्ये लपलेली आहे.

संशोधकांनी सांगितले की, या आकाशगंगेचा सिग्नल एवढा लांबून आला होता की, पृथ्वीवर पोहचण्यासाठी त्याला जवळपास 1.25 कोटी वर्ष लागली. या आकाशगंगेमुळे विज्ञानातील अनेक गोष्टींचे रहस्य समोर येईल.

याआधी पुण्यातील गेट मीटर-वेव रेडिओ टेलिस्कोपद्वारे ब्रह्मांडामधील सर्वात लांब असलेली आकाशगंगा शोधण्यात आली होती.

Leave a Comment