Video : अभिमानास्पद ! दिवाळीच्या निमित्ताने दुबई पोलिसांनी वाजवले भारतीय राष्ट्रगीत

दिवाळीचा सण म्हटले की, भारतीय लोकांमध्ये एक उत्साह संचारलेला असतो. भारतीय नागरिक जगातील कोणत्याही कोपऱ्यात असू द्या, ते आनंदाने आणि धुमधडाक्यात दिवाळी साजरी करत असतात. दुबई पोलिसांचा सध्या एक मने जिंकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिवाळीच्या निमित्ताने दुबई पोलिसांच्या बँडने भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रगीत वाजवले.

व्हिडीओमध्ये दिसते की, दुबई पोलिसांचे बँड ‘जन गण मन’ वाजवत आहेत व खाली उभे असलेले भारतीय नागरिक अभिमानाने राष्ट्रगीत गात आहे. हा दिवाळीच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ आहे.

दुबई पोलिसांच्या या कृत्याची युजर्सकडून कौतूक केले जात आहे. दुबई टुरिझमकडून खास भारतीय नागरिकांसाठी दिवाळीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आतापर्यंत 15 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ बघितला असून, भारतीय युजर्स दुबई पोलिसांचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment