पाक टिकटॉक स्टारचा पराक्रम, थेट पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसून काढला व्हिडीओ

पाकिस्तानची टिकटॉक स्टार हरीम शाह सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तिने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात टिकटॉक व्हिडीओ बनवला असून, हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हरीम शाहचे टिकटॉकवर लाखो फॅन्स आहेत. कार्यालयातील ज्या खुर्चीवर परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान बसतात, त्या ठिकाणी ती बसली. विशेष म्हणजे या टिकटॉक व्हिडीओमध्ये बॉलिवूड गाणी वाजत आहेत.

सोशल मीडियावर हरीम शाहचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे. हरीम शाहने स्पष्ट केले की, मी परवानगी घेऊन कार्यालयात गेले होते. जर हे नियमांच्या विरोधात होते तर मला व्हिडीओ बनवण्याची परवानगी नव्हती द्यायला हवी.

ती म्हणाली की, मी नॅशनल असेंबलीमध्ये देखील गेले. माझ्याजवळ पास होता. मला कोणीही अडवले नाही. मला काहीही त्रास झाला नाही.

https://twitter.com/iamHareemshah/status/1186941076751486977

हरीम शाह अनेकदा पाकिस्तानच्या नेत्यांबरोबर दिसली आहे. आधी सांगण्यात आले की, हरीम पंतप्रधान कार्यालयात गेली, त्यानंतर सांगण्यात आले की, ती परराष्ट्र मंत्रालयाच्या बिल्डिंगमध्ये गेली होती. या घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या घटनेवर सोशल मीडियावर युजर्स पाकिस्तान सरकारची खिल्ली उडवत आहे. पाक सरकारला कशाचे गांभीर्य आहे की नाही ? असा प्रश्न देखील युजर्स विचारत आहे.

Leave a Comment