सई ताम्हणकरच्या आगामी ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’चा ट्रेलर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री सई ताम्हणकर आपला नवा चित्रपट घेऊन येत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ असे असून या नव्या चित्रपटाच्या कथानकनुसार प्रत्येकाच्या आयुष्यात तरुणीची, स्त्रीची, आईची आणि बायकोची भूमिका किती महत्त्वाची असते व त्याच स्त्रीला किती तडजोडी कराव्या लागतात यावर भाष्य करणारे आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सई ताम्हणकरच्या बोल्ड वाक्याने ट्रेलरची सुरुवात होते आणि त्यानंतर टप्याटप्याने सईने साकारलेल्या भूमिकेची झलक उलगडत जाते. या चित्रपटात सईसोबत अभिनेते निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सईच्या नवऱ्याचे पात्र निखिल साकारत आहे. त्याचे हे पात्र कसे आहे तसेच त्याचा स्वभाव कसा आहे याची कल्पना प्रेक्षकांना या ट्रेलरमधून येते. त्याचसोबत सईला राजेशने साकारलेल्या पात्राची कशी साथ मिळते हा संपूर्ण प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 22 नोव्हेंबर रोजी ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट महाराष्ट्रभर रिलीज होणार आहे. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे.

Leave a Comment