जाणून घ्या सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या गोपाल कांडांविषयी

हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून, कोणत्याही पक्षाला येथे बहुमत मिळालेले नाही. हरियाणातील एक उमेदवार सध्या ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहे. हे उमेदवार आहेत हरियाणा लोकहित पार्टीचे (एचएलपी) नेते गोपाल कांडा. कांडा यांचा केवळ 602 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी गोकुल सेतिया यांचा पराभव केला. गोपाल गांडा यांच्यासोबत 7 अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देणार आहेत. सध्या अनेकजण गोपाल गांडा यांच्या मागील गोष्टींबद्दल माहिती देत आहे.

एअर हॉस्टेस गीतिका शर्मा मर्डर प्रकरणात गोपाल कांडा यांचे नाव आले होते. त्यावेळी भाजपच्या महिला मोर्चाने कांडा यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यामुळे म्हटले जात आहे की, जे भाजप आधी कांडा यांच्या विरोधात होते. ते आता त्यांचाच पाठिंबा घेत आहेत.

2009 मध्ये देखील कांडा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी हुड्डा सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद देखील मिळाले होते.

2012 मध्ये कांडा चर्चेचा विषय ठरले होते. त्यांच्या एअरलाइन कंपनी एमडीएलआरमध्ये काम करणारी महिला कर्मचारी गीतिका शर्माने आत्महत्या केली होती. गीतिकाच्या सुसाइड नोटमध्ये गोपाल कांडा व कंपनीतील कर्मचारी अरूणा चढ्ढाचे नाव होते.

6-7 महिन्यानंतर गीतिकाच्या आईने देखील आत्महत्या केली. आईने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये देखील कांडा यांचे नाव होते. याप्रकरणात त्यांना 18 महिने जेलमध्ये राहावे लागले होते.

जेलमध्ये गेल्यावर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 2014 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप हटवले होते. त्यानंतर त्यांनी छोटा भाऊ गोबिंद कांडाला सोबत घेऊन हरियाणा लोकहित पक्ष स्थापन केला.

असे म्हटले जाते की, कांडा सिरसा येथे हवाई चप्पलांचे काम करायचे. त्यांचे एक शोरूम होते. त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेटमध्ये एंट्री केली. एवढेच नाहीतर त्यांनी एअरलाइन कंपनी देखील स्थापन केली. मात्र आर्थिक संकटांमुळे ही कंपनी बंद पडली.

त्यामुळे बलात्कार आणि खुनाचा आरोप असलेल्या कांडा याचा पाठिंबा हरियाणामध्ये सरकार स्थापन्यासाठी भाजप घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण, भाजपला हरियाणामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ 6 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

 

Leave a Comment