हरभजन की बुमराह ? या मुलीच्या बॉलिंग स्टाईलमुळे गोंधळात पडले नेटकरी

क्रिकेटचे चाहते भारतात जेवढे सापडतील, तेवढे जगभरात कोठेच दिसणार नाहीत. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंकडून प्रेरणा घेऊना त्यांच्या सारखीच फलंदाजी, गोलंदाजी करण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र या मुलीची गोलंदाजी हरभजन सिंह सारखी आहे की जसप्रीत बुमराह सारखी यावरून नेटकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की, देशातील अनेक महत्त्वकांक्षी स्पिनर्सप्रमाणे… हरभजन सिंह या या मुलीचे प्रेरणास्थान तू आहे असे वाटते. ट्विटमध्ये आकाश चोप्राने हरभजन सिंहला टॅग देखील केले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक युजर्स हरभजन सिंह आणि जसप्रीत बुमराहचे हे मिश्रण असल्याचे म्हणत आहेत.

तर काहींनी या मुलीला लेडी टर्बिनेटर देखील म्हटले.

आतापर्यंत या व्हिडीओला 85 हजार जणांनी पाहिले असून, शेकडो कमेंट्स या ट्विटवर आल्या आहेत.

Leave a Comment