क्रिकेटपटूंसाठी चक्क पंतप्रधान बनले वॉटर बॉय!


नवी दिल्ली : अनेकदा चाहते क्रिकेटच्या मैदानात घुसखोरी करतात. चाहते सामना सुरू असताना ऐनवेळी मैदानात घुसल्याने सुरक्षा व्यवस्थेची धावपळ उडते. पण आता कॅनबरात झालेल्या एका सामन्यात देशाचे पंतप्रधान स्वत: खेळाडूंसाठी पाणी घेऊन दाखल झाले.

प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध श्रीलंका यांच्यात कॅनबरात सामना झाला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यावेळी स्वत: ड्रिंक्स घेऊन मैदानावर पोहचले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे ओव्हलवर झालेल्या या सामन्यात पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


तीन टी20 सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. 27 ऑक्टोबरला अॅडलेडवर पहिला सामना होणार आहे. त्याआधी श्रीलंका आणि प्राइम मिनिस्टर इलेव्हन यांच्यात सराव सामना झाला. यावेळी लंकेचा फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन मैदानावर पाण्याच्या बाटल्या घेऊन आले.

श्रीलंका विरुद्ध सराव सामन्यात प्राइम मिनिस्टरने एक गडी राखून विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लंकेने 8 बाद 130 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना प्राइम मिनिस्टर इलेव्हनकडून हॅरि नेल्सनने 50 चेंडूत 79 धावांची वेगवान खेळी केली. लंकेकडून ओशादा फर्नांडोने सर्वाधिक 38 धावा केल्या.

Leave a Comment