
आपल्या आगामी ‘पागलपंती’ या चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या चर्चेत आहे. ‘पागलपंती’ हा मल्टीस्टारर चित्रपट असून ‘पागलपंती’ चित्रपटातील या सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक रिलीज केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांची चित्रपटाची उत्सुकता देखील वाढवली आहे.
जॉन बऱ्याच दिवसानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बज्मी हे करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, मंगत पाठक, अभिषेक पाठक यांनी केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडन आणि लीडस यांसारख्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले.
मल्टीस्टारर असलेल्या ‘पागलपंती’चा ट्रेलर रिलीज
जॉनशिवाय यात इलियाना डिक्रुझ, अनिल कपूर, अर्शद वारसी, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला, क्रिती खारबंदा आणि पुलकीत सम्राट या कलाकारांच्याही महत्तावाच्या भूमिका असणार आहेत. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
