घड्याळासमोरील बटण दाबले तरीही मत कमळालाच, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार


सातारा – सोमवारी राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. दरम्यान, लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील साताऱ्यात मतदान झाले. पण सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील आरोप संबंधीत ग्रामस्थांनी केला आहे.

हा प्रकार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर घडला. मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी काही मतदारांनी घड्याळासमोरील बटण दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपच्या उमेदवाराला मत दिल्याचे दिसत होते. ग्रामस्थांच्या हा प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. ईव्हीएम मशीन त्यानंतर बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

सुरुवातीला मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. पण, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर यामध्ये पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे नवले गावात काल मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण होते. दहा-बारा तक्रारी आल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील ईव्हीएम बदलण्यात आले. पण, तोपर्यंत सुमारे २९० मतदारांनी मतदान केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

Leave a Comment