14 वर्षांपासूनच्या जोडीदारासोबत नदाल विवाहबद्ध

स्पेनचा स्टार टेनिसपटू 33 वर्षीय राफेल नदालने शनिवारी 14 वर्षांपासून डेट करत असलेल्या गर्लफ्रेंड जिशा पेरेलोशी मॅलोर्का येथे लग्न केले आहे. 19 ग्रँड स्लॅम विजेता नदालने मागील वर्षी साखरपूडा केला होता. 2005 पासून दोघे एकमेंकाबरोबर आहेत. दोघेही मॅलोर्का येथील राहणारे असून, तेथेच त्यांनी लग्न केले आहे.

राफेल नदाल-जिशाच्या लग्नात 1975 ते 2014 या दरम्यान स्पेनचे राजा राहिलेले जुआन कार्लोस प्रथम देखील आले होते. या वेळी लग्नात 350 पाहुणे उपस्थित होते.

31 वर्षीय जिशा पेरेलो इन्वेस्टमेंट बँकर होती. नंतर तिने नोकरी सोडून राफेल नदालची संस्थेमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. या संस्थेला नदालने 10 वर्षांपुर्वी सुरू केले होते. राफेल नदाल आणि पेरेलो यांची भेट नदालची बहिण मॅरिबोलने करून दिली होती. पेरोलो लाइमलाइटपासून देखील लांब असते.

 

Leave a Comment