या महिला क्रिकेटपटूला बॉयफ्रेंडने भर मैदानातच फिल्मी स्टाईलने केले प्रपोज

महिला बिग बॅश लीग फ्रेंचाईजीच्या अॅडिलेड स्ट्राइकरची खेळाडू अमांडा वेलिंग्टनला मॅच संपल्यावर तिच्या बॉयफ्रेंडने चक्क भर मैदानातच लग्नासाठी प्रपोज केले आहे. लेग स्पिनर असलेली वेलिंग्टन मेलबर्न रेनेगेड्स विरूध्द मिळालेल्या विजयाचा आनंद साजरा करत होती. त्याच वेळी बॉयफ्रेंड टेलर मॅक्केशनीने आमंडा वेलिंग्टनला मैदानात इतर सर्व खेळाडूंसमोर गुडघ्यांवर बसून फिल्मी स्टाईलने लग्नासाठी मागणी घातली.

अॅडलेड स्ट्राईकर्सने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 22 वर्षीय आमंडा व्हिडीओमध्ये प्रपोजचे उत्तर ‘हो’ देताना दिसत आहे. हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

अमांडा म्हणाली की, मी जेव्हा टेलरला मैदानावर येताना बघितले तेव्हा मला वाटले की, तो सर्व खेळाडूंबरोबर फोटो काढण्यासाठी येत आहे. मला थोडाही अंदाज नव्हता की तो या प्रकारे प्रपोज करेल. त्याने मला प्रपोज करून आश्चर्यचकित केले आहे. मात्र मी आनंदी आहे.

अमांडाने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले होते. तिने आंतरराष्ट्रीय टीमकडून आतापर्यंत 1 कसोटी, 9 टी-20 आणि 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Leave a Comment