भारतात उपचारासाठी गंभीरने केली पाकिस्तानी मुलीची मदत

माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने ह्रदय रोगाने ग्रस्त असलेल्या एका सहा वर्षीय पाकिस्तानी मुलीला भारतात उपचार घेता यावा यासाठी व्हिजा मिळवून देण्यास मदत केली आहे.

गौतम गंभीर यांनी परराष्ट्र मंत्रालयाला यासाठी पत्र लिहिले होते. गंभीर यांच्या पत्रानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्लामबादमधील भारतीय उच्च आयुक्ताला त्या मुलीस व तिच्या कुटुंबीयाला व्हिसा देण्याचे निर्देश दिले. गंभीर यांनी सांगितले की, त्यांना या मुलीची माहिती फोनद्वारे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफकडून मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी 1 ऑक्टोंबरला परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले. या पाकिस्तानी मुलीला व्हिसा दिल्याबद्दल गंभीर यांनी एस. जयशंकर, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांचे देखील आभार मानले व ट्विटरवर कविता शेअर करत स्वतःचा आनंद व्यक्त केला.

याआधी 2012 मध्ये नोएडाच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये या मुलीवर उपचार करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.

Leave a Comment