येणार सलमानच्या ‘वॉन्टेड’चा सिक्वेल, असे असेल नाव


अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा तिसऱ्यांदा एकत्रित काम करणार असून दोघांची सुपरहिट जोडी ‘वॉन्टेड’ आणि ‘दबंग ३’ नंतर नव्या चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटाचे शीर्षक ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ असे असेल.


२०२० च्या ईदला ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी राधे या चित्रपटाची घोषणा झाल्याचे ट्विट केले आहे.


यंदाच्या ख्रिसमसमध्ये सलमान खान दबंग ३ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर पुढील वर्षी ईदला ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट भेटीस येणार आहे.

Leave a Comment