शतकवीर रोहित शर्मा बनला गावसकरांनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज


रांची – रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावले. त्याचे या मालिकेतील हे तिसरे शतक ठरले. रोहित शर्माने याआधी विशाखापट्टणमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावले होते. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठरले.

रोहित शर्मा या शतकी खेळीसह तो एका कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी याआधी अशी कामगिरी केली होती. अजिंक्य रहाणेच्या सोबत रोहित शर्माने शतकी भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फसला. मयांक, पुजारा आणि कोहली हे स्वस्तात माघारी परतल्यानंतर रोहित आणि अजिंक्यने खेळपट्टीवर पाय रोवून धरत संघाचा डाव सावरला. अजिंक्य रहाणेनेही अर्धशतक झळकावत रोहित शर्माला उत्तम साथ दिली.

Leave a Comment