असे आहेत ‘पागलपंती’मधील कलाकारांचे लूक


आपल्या आगामी ‘पागलपंती’ या चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम चर्चेत आहे. ‘पागलपंती’ हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून अरशद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रुझ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्ला यांसारखी स्टारकास्ट यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या ‘पागलपंती’ चित्रपटामधील या सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत.


प्रत्येक कलाकाराचे पात्र नेमके कसे आहे, याची झलक चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टरमध्ये पाहायला मिळते. यामध्ये प्रत्येकजण ‘पागलपंती’ करताना दिसतो. जॉन या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारत आहे. तो ‘राज किशोर’ हे पात्र या चित्रपटात साकारत आहे.


दिमाग मत लगाना क्योंकी इनमे है ही नहीं, अशी टॅगलाईन असलेले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. यावरुन चित्रपटात केवळ धमाल पाहायला मिळणार, याचा अंदाज लावता येतो.


या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बज्मी हे करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, मंगत पाठक, अभिषेक पाठक यांनी केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडन आणि लीडस यांसारख्या ठिकाणी करण्यात आले आहे. मुंबईच्या काही भागांमध्येही हा चित्रपट शूट करण्यात आला आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment