
आपल्यापैकी सर्वांना हॉलिवूडमधील ‘फ्रेन्ड्स’ सीरिज ही माहिती असेलच. अलिकडेच इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या सीरिजमधील अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिने एन्ट्री केली आहे. पण, तिच्या पहिल्याच पोस्टनंतर तिच्या अकाऊंटवर चाहत्यांनी धडाधड फॉलो करण्यास सुरुवात केल्यामुळे तिचे अवघ्या पाच तासात १०२ कोटी फॉलोअर्स झाल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली आहे.
इंस्टाग्रामवर एंट्री घेताच अभिनेत्री जेनिफर एनिस्टनने रचला विश्वविक्रम
कलाकारांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचे एक सोपे साधन झाले आहे. आपल्याबद्दलचे अपडेट्स ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. चाहतेदेखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या पोस्ट पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळेच जेनिफरने पहिली पोस्ट शेअर केल्यानंतर लगेच तिच्या चाहत्यांनी तिच्या अकाऊंटला भेट दिली.
‘फ्रेन्ड्स’ सीरिजसोबतच ‘डिरिल्ड’, ‘ब्रुस ऑलमायटी’, ‘द बाऊटी हंटर’ यामध्येही जेनिफरने भूमिका साकारली आहे. सुरुवातीला तिचा सोशल मीडियाला विरोध होता. मात्र, आता तिनेही इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे.
