
काल (१७ ऑक्टोबर) देशभरात ‘करवा चौथ’ साजरा करण्यात आला. महिला हे व्रत आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करत असतात. बॉलिवूडमध्येही ‘करवा चौथ’चा सोहळा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, चित्रपटातच नाही, तर खऱ्या आयुष्यातही बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी करवा चौथ साजरी केली. ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा हिनेही यामध्ये ‘करवा चौथ’चे व्रत केले. तिने तिच्या करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
देसी स्टाईलमध्ये प्रियंकाचा ‘करवा चौथ’
अगदी देसी स्टाईलमध्ये प्रियंकाने करवा चौथ साजरा केला. तिने हातावर मेहंदी, लाल जुडा घालुन फोटोही काढले. यावेळी तिचे मित्र मैत्रिणीदेखील उपस्थित होते. प्रियंकाचा हा पहिलाच करवा चौथ असल्यामुळे या सोहळ्याचे तिने अगदी उत्साहाने सेलिब्रेशन केले.
प्रियंका आणि निकने मागच्या वर्षी लग्नगाठ बांधली होती. दोघांची जोडी लग्नानंतरही बऱ्याच कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही दोघांची क्रेझ पाहायला मिळते.
प्रियंकाचा लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पहिलाच चित्रपट अलिकडेच रिलीज झाला. तिने ‘द स्काय ईज पिंक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. प्रियंकाने या चित्रपटातून तब्बल ३ वर्षानंतर कमबॅक केले. या चित्रपटाला समीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र, बॉक्स ऑफिसवरची कमाई मात्र, संथ आहे.
