नवाजुद्दीनच्या ‘मोतीचूर चकनाचूर’चे पहिले गाणे रिलीज


‘मोतीचूर चकनाचूर’च्या निर्मात्यांनी नुकतेच ‘क्रेजी लगदी’ गाणे रिलीज केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत या चित्रपटातील हे गाणेदेखील चित्रपटाच्या ट्रेलर एवढेच आकर्षक आहे. या गाण्यात तुम्हाला या चित्रपटातील नायक पुष्पिंदर त्यागी ( नवाजुद्दीन सिद्दीकी ) आणि नायिका ऐनी( आतिया शेट्टी) यांच्यातील रोमँटिक प्रेमाची झलक पाहायला मिळत आहे.

अथिया शेट्टीला विदेशात जायचे असते. ती याच कारणासाठी नवाजुद्दीनसोबत लग्न करते. पण तिला लग्नानंतर कळते, की त्याला लग्नानंतरच नोकरी लागली आहे. तिला ही गोष्ट समजल्यानतंर काय काय प्रसंग घडतात, त्याची झलक या गाण्यामध्ये पाहायला मिळते. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी झळकणार आहे. दोघांच्याही लग्नाची हटके गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही अलिकडेच रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचे पहिले गाणेही रिलीज करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment