सरकार आणू शकते ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेवर सेन्सॉरशिप

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम सारख्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरशिप लावण्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. अनेक संघटनांनी अनेकदा नेटफ्लिक्सवर अश्लील कंटेटचा आरोप केला आहे, तसेच त्यावर बंदी घालण्याची देखील मागणी केली आहे. आता सरकार या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप आणण्याचा विचार करत आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही महिन्यात ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग अॅप्स विरोधात अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, यामध्ये आरोप करण्यात आला आहे की, यावर अश्लील गोष्टी आणि धार्मिक भावना दुखावणारे कंटेट दाखवले जाते.

भारतामध्ये टिव्ही आणि चित्रपटांवर आधीपासूनच सेन्सॉरशिप आहे. मात्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप नाही. हॉटस्टारने काही महिन्यांपुर्वीच स्वतःचे कोड ऑफ एथिस्कस तयार केले आहे. मात्र नेटफ्लिक्सने असे काहीही केलेले नाही.

Leave a Comment