पुन्हा एकदा ट्रोल झाली ड्रामा क्वीन


कायमच आपल्या अतरंगी व्हिडिओ किंवा वादग्रस्त विधानांमुळे बॉलिवूडची ड्रम क्वीन राखी सावंत चर्चेत असते. नेहमी प्रमाणेच चर्चेत राहायला राखीने अजून एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण दरवेळेस सारखी याही वेळी ती लोकांकडून ट्रोल झाली आहे.


या व्हिडिओमध्ये राखीने सांगितल्यानुसार ‘करावा चौथ’चा व्रत तिने ठेवला होता. तसेच ती सध्या यूकेमध्ये असल्याचे तिने सांगितले आहे व ती गाजर हलवा बनवत आहे. पण निरखून बघितल्यास तुम्हालाही दिसेल कि तिच्या घरातील किचन हे भारतीय असल्याचे दिसून येते. तसेच घरातील भांडी, गॅस स्टोव्ह सगळेच आपल्या देशातील असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे सर्व बघून नेटकऱ्यांनी राखीला खूपच ट्रोल केलेले कॉममेंट्समधून स्पष्ट दिसत आहे.

Leave a Comment