फेसबुकमुळे भारतातील अडीच लाख महिला होणार डिजिटल साक्षर

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकने भारतातील अदिवासी महिलांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘डिजिटल बेटी अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात फेसबुक भारत सरकारची मदत करणार आहे.

या अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना इंटरनेटबद्दल माहिती दिली जाईल व त्यांना डिजिटल साक्षर केले जाईल. फेसबुकने या बाबतची माहिती नवी दिल्लीत आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेस 2019 मध्ये दिली आहे.

फेसबुकच्या या योजनेंतर्गत आदिवासी महिलांना तंत्रज्ञानाद्वारे रोजगार मिळवण्यासाठी सक्षम बनवले जाईल. याशिवाय त्यांना ऑनलाईन सिक्युरिटी आणि प्रायव्हेसी याबद्दल देखील माहिती दिली जाईल. या अभियानात फेसबुक भारत सरकारच्या मदतीने कॉमन सर्विस सेंटरच्या 5000 ग्रामीण स्तरावरील उद्योजकांची निवड करेल.

ही निवड देशातील 10 शहरांमधून होईल. ज्यामध्ये जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड तेलंगाणा, बिहार, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील शहरांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत 3000 गावातील 2.50 लाख ग्रामीण उद्योजकांना ट्रेनिंग दिली जाईल.

Leave a Comment