क्रिकेटमधील असा झेल तुम्ही कधी पाहिलाच नसेल


नवी दिल्ली – भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिके विरोधातील टी-20ची 3 सामन्याची मालिका 3-0 ने जिंकली. भारताने या मालिकेतील अखेरचा रोमांचक सामना 6 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय खेळाडू एकता बिष्टने विचित्र झेल घेतला. सध्या सोशल मीडियावर या झेलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेसमोर 146 धावांचे माफक आव्हान दिले होते. तेव्हा आफ्रिकेचा संघ एकावेळेस मजबूत स्थितीत दिसत होता. भारतीय कर्णधार मिताली राजने अशा स्थितीत आपली स्टार फिरकी गोलंदाज एकता बिष्टच्या हाती चेंडू सोपवला. एकताने आपल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या नोडूमिसो शानघासेचा विचित्र झेल घेत बाद केले.


नोडूमिसो जोरदार स्ट्रेट शॉट लगावला. नोडूमिसोच्या बॅटमधून निघालेल्या जबरदस्त शॉटला अडवणे कठीण होते. पण एकताच्या हाताला चेंडू लागला आणि चेंडू उडत मिड ऑफमध्ये उभ्या असलेल्या मानसी जोशीच्या दिशेने गेला आणि मानसीने तो झेल झेलला. दरम्यान, भारताने दिलेल्या 146 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 140 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला.

Leave a Comment