महिला विश्वचषक स्पर्धेच्या बक्षिसाच्या रक्कमेत आयसीसीची वाढ


महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या बक्षिसाच्या रक्कमेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) भरघोस वाढ केली आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले असून २०२१ च्या विश्वविजेत्या संघाला वाढीव रक्कम मिळणार आहे.


महिला विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर विजेत्या संघाला पूर्वी १४ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळत होते. पण, आयसीसीने यामध्ये आता १० करोड रुपयांची वाढ केल्यामुळे २०२१ च्या विश्वविजेत्या संघाला २४ कोटी रुपये मिळणार आहेत. या निर्णयासोबतच आयसीसीने महिला क्रिकेटमध्येही अंडर-१९ महिला विश्वचषक स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेचे पहिल्यांदाच २०२१ मध्ये आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार आहे.

Leave a Comment