गुगलने डिलीट केली ही धोकादायक 29 अॅप्स


सध्याच्या डिजीटल युगात डेटा चोरीच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असून याला आळा घालण्याचा गुगलकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून नुकतेच 29 लोकप्रिय हटवण्यात आले आहेत. हे अ‍ॅप्स जवळपास एक कोटींहून अधिक युजर्सनी डाउनलोड केले आहेत. या अ‍ॅप्सबाबत ‘सायबर सिक्युरिटी फर्म क्विक हिल सिक्युरिटी लॅब’कडून तक्रार करण्यात आली होती. उपकरणांमध्ये 29 पैकी 24 अ‍ॅप्स हे जाहिरातींद्वारे HiddAd मॅलवेअर (व्हायरस) सोडत असल्यामुळे हटवण्यात आल्याची माहिती आहे. हे अ‍ॅप्स गुगलने प्ले स्टोअरमधून युजर्सची खासगी माहिती चोरत असल्यामुळे हटवले आहेत.

याबाबत क्विकहिलने दिलेल्या अहवालानुसार, हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर ते आपला आयकॉन लपवायचे व आपोआप एक शॉर्टकट तयार करायचे. अ‍ॅप युजरला अनइंस्टॉल करता येऊ नये यासाठी आयकॉन लपवला जायचा. त्यानंतर, होमस्क्रीनवरील शॉर्टकटवर युजरने टच केल्यास डिव्हाइसमध्ये फुल स्क्रीनमध्ये जाहिराती दिसायच्या. तर अन्य पाच अ‍ॅप्समध्ये जाहिरातींद्वारे Adware चा वापर केला जात होता.

गुगलने प्ले स्टोअरवरुन डिलीट केले अॅप्स
क्विकहीलच्या यादीनुसार, यामध्ये फील कॅमेरा एचडी (Feel Camera HD), फिल्टर फोटो फ्रेम (Filter Photo Frame), लेंस फ्लेअर्स (Lens Flares), मॅजिक इफेक्ट (Magic Effect), क्यूआर कोड स्कॅनर (QR Code Scanner), सुपर मार्क (Super Mark), फोटो इफेक्ट प्रो(Photo Effect Pro), आर्ट फिल्टर (Art Filter), लाय डिटेक्टर प्रँक (Lie Detector prank), न्यू हेअर फॅशन (New Hair Fashion), स्मार्ट मॅग्निफायर प्रो (Smart Magnifier Pro), मॅग्निफायर प्रो-मॅग्निफायिंग ग्लास (Magnifier Pro- Magnifying glass), मॅग्निफायिंग ग्लास प्रो (Magnifying Glass Pro), कट कट मिक्स (Cut Cut Mix), कट कट मिक्स प्रो (Cut Cut Mix Pro), गॅलेक्सी ओव्हरले (Galaxy Overlay), कलर स्प्लॅश फोटो इफेक्ट (Color Splash Photo Effect), एज फेस (Age Face), फोटो ब्लर (Photo Blur), ब्लर इमेज (Blur Image), सुपर मॅग्निफायर लाइट (Super Magnifier Lite), मॅग्निफायिंग प्रो (Magnifying Pro), क्विंग कॅमेरा (Qing Camera), रिफ्लेक्स कॅमेरा एचडी (Reflex Camera HD), फर्स्ट कॅमेरा एचडी (First Camera HD), रिदम कॅमेरा (Rhythm Camera), प्रिटी मेकरअप फोटो (Pretty Makerup Photo), ग्लिच लेंस-व्हेपरवेव अँड घोस्ट फोटो एडिटर (Glitch Lens – Vaporwave & Ghost Photo Editor), मल्टी अ‍ॅप्स-मल्टिपल अकाउंट्स सायमल्टेनियस्ली(Multi Apps – Multiple Accounts Simultaneously) या अॅप्स समावेश आहे.

Leave a Comment