‘परमवीर चक्र’ पुरस्कारप्राप्त सैनिकाच्या बायोपिकमध्ये झळकणार वरुण धवन


लवकरच परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या अरुण खेतरपाल यांच्या बायोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवन भूमिका साकारणार आहे. भारतीय सैन्यातील सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल हे अधिकारी होते. त्यांना ‘परमवीर चक्र’ हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखविलेल्या शौर्याबद्दल मरणोत्तर दिला गेला. आता त्यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.


या बायोपिकचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि निर्माते दिनेश विजन या बायोपिकसाठी एकत्र येणार आहेत. वरुण धवनसोबत दोघांनीही ‘बदलापूर’ या चित्रपटासाठी काम केले होते. या बायोपिकबद्दलची अधिकृत माहिती चित्रपट समीक्षक तरण – आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Leave a Comment