१०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार गौतम गंभीर


पुन्हा एकदा आपले वेगळेपण भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने सिद्ध केले आहे. गंभीर आपल्या गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गौतम गंभीरने याबद्दलची माहिती दिली आहे.


देशासाठी या सर्व मुलांच्या शहीद वडिलांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे, आपण यासाठी त्याचे कायम ऋणी राहणार असल्याचे हे दाखवण्याची वेळ आता आली आहे, असे म्हणत गंभीरने या नवीन उपक्रमाबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान गौतम गंभीरने सोमवारी वयाच्या ३९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

Leave a Comment