टीझर; “रॉमकॉम” चित्रपटात झळकणार ही नवोदित जोडी


एक नवोदित जोडी ‘रॉमकॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राहुल आणि सुमन या प्रमुख भूमिकांमध्ये विजय गिते आणि मधुरा वैद्य दिसणार असून नुकताच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला.

“रॉमकॉम” या चित्रपटाची निर्मिती ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म आणि कास्टिंग एजन्सी यांनी केली आहे. तर सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सुशील शर्मा सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गोरख जोगदंडे यांनी केले आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी मांडण्यात आली आहे. हळुवार, हलकीफुलकी, नात्याचे विविध पदर उलगडणारी अशी ही प्रेमकहाणी आहे.

यापूर्वी स्ट्रगलर्स, इपितर, दोस्तीगिरी अशा चित्रपटांत विजयने भूमिका साकारल्या आहेत. तर तुझ्यात जीव रंगला या मालिकेत मधुराने काम केले होते. त्यामुळे मधुराचा रॉमकॉम हा पदार्पणाचा चित्रपट ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीला या निमित्ताने एक फ्रेश जोडी मिळणार आहे. या कलाकारांसोबतच किशोर कदम, छाया कदम, अंतरा पाटील, श्वेता नाईक, स्वाती पानसरे, फकिरा वाघ, दिलीप वाघ, शोभा दांडगे, सिद्धेश्वरा आणि आसित रेड्डी या कलाकारांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Leave a Comment