क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच चक्क तीन कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात


नवी दिल्ली – नाणेफेकीचा कौल क्रिकेटमध्ये फार महत्वाचा समजला जातो. नाणेफेक जिंकणे म्हणजे अर्धा सामना जिंकणे असे क्रिकेटमधील खेळपट्टीनुसार मानले जाते. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या महिला संघात नुकताच क्रिकेटचा सामना झाला. एक विचित्र गोष्ट या सामन्याच्या नाणेफेकीवेळी पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून या नाणेफेकीदरम्यान दोन खेळाडू आणि लंकेच्या संघाकडून कर्णधार असे तीन खेळाडू मैदानात आले. तिथे असणारे माजी खेळाडूही हे पाहून आश्चर्यचकित झाले. नाणेफेकीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघाची कर्णधार मॅग लेनिंग आणि एलिसा हिली तर, दुसरीकडे श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू उपस्थित होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून दोन खेळाडू का ? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर लेनिंगने दिलेले उत्तर भन्नाट होते.


लेनिंग म्हणाली, नाणेफेकीच्या बाबतीत मी कमनशिबी ठरले आहे. मी बऱ्याच नाणेफेकीचा कौल हरलेले असल्यामुळे नाणेफेकीचा कर्णधार म्हणून मी हिलीला निवडले आणि ही नाणेफेक हिलीने जिंकलीच, त्याचसोबत तिने आपल्या कर्णधाराचा विश्वासही जिंकला आहे.

Leave a Comment