हाडे मजबूत होण्यासाठी उपयुक्त आहार

bones
आपले शरीर उभे राहते, त्याला हाडांचा आधार असतो. पण हाडे मजबूत नसतील तर शरीर ताठ राहणार नाही आणि शरीराचा हा आधार असलेली हाडे वयाची ३० वर्षे उलटल्यानंतर कमकुवत व्हायला सुरुवात होते. हा कमकुवतपणा टाळण्यासाठी पाच प्रकारची खाद्ये आवश्यक समजली जातात. त्यांचा आपल्या आहारातला वापर वाढवला तर हाडे मजबूत राहतात. म्हणून आपल्या आहाराचे नियोजन करताना या पाच प्रकारच्या अन्न घटकांवर लक्ष दिले पाहिजे.

दूध – हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियममुळेच हाडांची व्यवस्थित वाढ होत असते. हा कॅल्शियमचा पुरवठा करणारे सर्वात मुख्य अन्न म्हणजे दूध. दररोज किमान ७०० मिलीग्राम कॅल्शियमचा पुरवठा शरीराला आवश्यक असतो. तो दुधातून होतो खरा, परंतु कॅल्शियमसाठी म्हणून दूध प्यायला लागलो तर चरबी वाढण्याचा धोका असतो. म्हणून दूध पिताना ते चरबीमुक्त असावे. म्हणजेच जास्त घट्ट दूध पिऊ नये. शक्यतो गायीचे दूध प्यावे.

दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, रिबोप्लेविन फॉस्फरस आणि जीवनसत्व ड, अ आणि ब-१२ यांचाही समावेश असतो. हे सगळे अन्न घटक हाडे मजबूत होण्यासाठी असतात. दुधाशिवाय हिरव्या पालेभाज्या याही हाडांसाठी उपयुक्त ठरतात. हिरव्यागार पालेभाज्या जाणीवपूर्वक खाल्ल्या पाहिजेत, कारण त्यातून ड जीवनसत्व आणि कॅल्शियम मिळते.

हाडे मजबूत होण्याकरिता शेंगादाणे आणि पिस्ता यांचा वापर करावा. पिस्त्यामध्ये ओमेगा-३ हा घटक असतो आणि काही फॅटी ऍसिडस्ही असतात. बदाम आणि शेंगादाणे यातूनही पोटॅशियमचा पुरवठा होतो. आपल्या लघवीमधून काही वेळा कॅल्शियम जाण्याची शक्यता असते. हा कॅल्शियमचा नाश बदामामुळे टळतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “हाडे मजबूत होण्यासाठी उपयुक्त आहार”

Leave a Comment