प्रतिक बब्बरच्या ‘यारम’चा ट्रेलर रिलीज


आजच्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बॉलिवूडमध्ये जणू काही स्पर्धाच सुरु आहे. त्यातच आता तरुणाईवर लक्ष केंद्रीत करत तयार झालेला ‘यारम’ या नव्या चित्रपटाच्या रिलीजची तयारी झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

‘यारम’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून याश्वी फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आवेस खान यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतिक बब्बर, सिध्दार्थ कपूर, इशिता राज, सुभा राजपूत, अनिता राज, दिलीप ताहिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात नताशा स्टँकोविक हिचा स्पेशल अॅपिरन्स आहे. तरुणाईला चित्रपटगृहाकडे वळवण्याची क्षमता ‘यारम’ या चित्रपटात असल्याचे ट्रेलरवरुन जाणवते. हा चित्रपट पुढील महिन्याच्या १८ तारखेला रिलीज होणार आहे.

Leave a Comment