सोशल मीडियावर धोनी शेअर केलेला मजेशीर व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?


मुंबई – सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ मागील काही काळासाठी क्रिकेटपासून दूर असणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने शेअर केला असून एक फलंदाज या व्हिडिओमध्ये गल्ली क्रिकेट खेळत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना धोनीने शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.

आपल्य़ा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून धोनीने हा व्हिडिओ शेअर केला. फलंदाज यामध्ये बाद होऊनही बाद देत नाही. हा फलंदाज ट्रायल चेंडू असल्याचे सांगत आहे. क्रिकेटमध्ये हा प्रकार तुम्ही बघितलाच असेल. तुम्हाला जेव्हा माहित असते की काय होणार आहे आणि तुम्ही कॅमेरा ऑन करता तेव्हा पुढच्या काही सेकंदात तुम्हाला तेच पाहायला मिळते. खासकरुन शाळेतील दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी ना कधी असे क्रिकेट खेळले पाहिजे, असे धोनीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.


धोनीने १२ वर्षांपूर्वी पाकला मात देऊन भारतासाठी पहिला टी-२० विश्वचषक मिळवून दिला होता. धोनी नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज मालिकेत खेळला नव्हता. आगामी विजय हजारे करंडकासाठी धोनी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महेंद्रसिंह धोनीने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. या स्पर्धेनंतर त्याने वेस्ट इंडीज आणि मायदेशात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घेतली. दरम्यान, सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन धोनी सप्टेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, धोनीने आपला ब्रेक अजून अडीच महिने वाढवल्याचे समजते आहे.

Leave a Comment