चार महिन्यात सानिया मिर्झाने कमी केले तब्बल २६ किलो वजन


नवी दिल्ली – जवळपास दोन वर्षांच्या मातृत्वाच्या रजेनंतर भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आता पुनरागमन करण्यासाठी खडतर सराव करत आहे. सानियाने दिवसाला किमान चार तास सराव करून २६ किलो वजन कमी केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या वर्कआऊटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओबरोबर सानियाने वजन कमी करण्यासाठी करत असलेल्या व्यायामाबद्दल सांगितले आहे. मागील वर्षी ३० ऑक्टोबर रोजी सानियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिने आई झाल्यानंतर काही महिने आराम केल्यावर हळूहळू व्यायामाला सुरुवात केली. तिने गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम सुरु केला आहे. दिवसाला सध्या ती चार तास सराव आणि व्यायाम करत असल्याचे याआधीच तिने सांगितले होते.

View this post on Instagram

We had documented little ‘tid bits from my post pregnancy journey back to being and feeling healthy and fit again .. I’ve been asked bout my ‘weight loss’ journey sooo many times .. how? When? Which? Where ? So I’ll try to post some of it here everyday or every few days .. I put on 23 kilos when I was pregnant and have managed to lose 26 in span of 4 months or so .. with a lot of hard work ,discipline and dedication .. I read msgs from women allll the time as to how they find it so difficult to come back to ‘normalcy’ after child birth and don’t take care of themselves or don’t find the motivation or inspiration .. Ladies, I just wanna say … if I can do it then anyone else can too .. believe me that one hour or 2 hours a day to yourself will do wonders to you physically but sooo much mentally as well .. ❤️ remember – #Mummahustles 🙃 Ps- this is me after losing a bit of weight already after Izhaan was born .. roughly 2 and a half half months after I delivered ..

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on


तिने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये आई झाल्यानंतर वजन कमी कसे करायचे असा सवाल विचारणाऱ्या महिलांना तिने खास संदेश दिला आहे. मी आई झाल्यानंतर आता पुन्हा निरोगी आणि तंदुरुस्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान मागील काही महिन्यांमध्ये अनेकांनी मला माझ्या वजन कमी करण्यासंदर्भात विचारले. कसे? कधी? कोणते? कुठे? असे वजन कमी करण्यासंदर्भातील अनेक प्रश्न मला विचारण्यात आले. म्हणून मी आता इथे (इन्स्टाग्रामवर) व्यायामाचा रोज एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे. मी गरोदर होते तेव्हा माझे वजन 23 किलोंनी वाढले होते. पण मागील चार महिन्यांमध्ये बरेच कष्ट करुन, नियमित व्यायाम करुन मी २६ किलो वजन कमी केले आहे.

अनेक महिला मला मेसेजवरुन आई झाल्यानंतर वजन कसे कमी करावे, स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात विचारत असतात. मी त्या महिलांना एवढेच सांगू शकते की जर मला हे शक्य झाले तर कोणालाही सहज शक्य होईल. माझ्यावर विश्वास ठेवा दिवसातून स्वत:साठी एक किंवा दोन तास काढून व्यायाम केला तर तुमच्या शरीराबरोबरच मनावरही या वर्कआऊटचा परिणाम जाणवेल. या पोस्टबरोबर सानियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मी आई झाल्यानंतर साधारण अडीच महिन्यानंतरचा असल्याचे तिने म्हटले आहे.

Leave a Comment