या महिलेने प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्यासाठी बनवले 300 फेक अकाउंट्स

अमेरिकेत सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या गैरवापराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही लोकांना 369 इंस्टाग्राम अकाउंट्स आणि जवळपास 18 वेगवेगळ्या ईमेलवरून धमकी दिली जात होती. आश्चर्य म्हणजे हे सर्व अकाउंट्स एकच महिला नियंत्रित करत होती.

या प्रकरणात एफबीआयच्या एजेंट्सनी सांगितले की, फिटनेस ट्रेनर आणि चार मुलांची आई टॅमी स्टिफन या सर्व अकाउंट्सचा वापर प्लोरिडामधील माजी व्यवसाय भागीदार आणि बॉडी बिल्डिंग वर्ल्डमधील तिच्या प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्यासाठी करत होती.

स्टीफनने एका मेसेजमध्ये लिहिले होते की, मी तुझ्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे करेल. सायबर स्टॉकिंग आणि ऑनलाइन धमकी देण्याच्या आरोपाखाली 37 वर्षीय स्टिफनला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या महिलेने तीन राज्यांमधील 5 लोकांना निशाणा बनवले. माजी व्यवसायिक भागीदाराशी बदला घेण्यासाठी तीने डोके नसलेली बाहुली घेत अपहरणाची योजना देखील बनवली होती. माजी व्यवसायिक भागीदाराने तिला ऑनलाइन फिटनेस कॉम्पिटिशन जिंकू दिले नाही, असे वाटत होते. म्हणून ती बदला घेत होती. मात्र हे आरोप खोटे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सर्व घटनांची सुरूवात 9 जुलै 2018 ला झाली. स्टिफनने शैरीफ ऑफिसमध्ये कॉल करून सांगितले की, तिच्या घरासमोर कोणातरी बाहुली ठेवली आहे व त्यात बाळासाठी नवीन खेळणे असे लिहिल आहे. त्यानंतर पाच दिवसांनी स्टिफनने शैरीफ ऑफिसमध्ये पुन्हा कॉल करत तिच्या मुलीला कोणातरी किडनॅप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.  आरोपी महिलेने हा हल्ला तिच्या माजी व्यावसायिक भागीदाराने केल्याचे सांगितले.

मात्र तपास केला असता सत्य समोर आले. स्टिफनला खोटी तक्रार आणि आपल्याच मुलीबरोबर चुकीचा व्यवहार करण्यासाठी 17 जुलैला अटक करण्यात आली. तिने स्वतःच्याच मुलीला खोट बोलण्यास सांगितले होते. तिने अनेकांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

Leave a Comment