काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी


सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी काळवीट शिकार प्रकरणात न्यायालयात सुनावणीला सामोऱ्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खानला मिळाली आहे. ही धमकी फेसबुक अकाऊंटवरून देण्यात आली आहे. फेसबुकच्या ‘गॅरी शूटर’ (Garry Shooter) नावाच्या अकाऊंटवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे. ही पोस्ट ‘सोपू’ नावाच्या ग्रुपमध्ये हिंदीत लिहिण्यात आली असून यामध्ये सलमान खानला चेतावणी देण्यात आली आहे.

भारतीय कायद्यानुसार तू वाचला असलास तरी बिन्शोई समुदायाच्या कायद्यापासून वाचू शकत नाही. सलमान खानचा एक फोटो देखील या पोस्टमध्ये आहे ज्यावर रेड क्रॉस मारण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, सलमान विचार कर, भारतीय कायद्यातून तू सुटला आहेस. पण बिन्शोई समाज आणि सोपू पार्टीच्या कायदयाने त्याला जीवे मारण्याची शिक्षा सुनावली आहे. तू सोपू न्यायालयात दोषी आहेस.

सोशल मीडियावर या पोस्टमुळे जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी जोधपुर न्यायालयात सादर व्हायचे आहे. सलमान खान जर या दिवशी न्यायालयात हजर राहिला नाही तर त्याचा जामीन रद्द होऊ शकतो. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी ही पहिल्यांदा दिलेली नाही. 2018 मध्ये गँगस्टर लॉरेस बिन्शोईने सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमान खानला कडक सुरक्षा देण्यात आली होती.

Leave a Comment