टी-२० क्रिकेटमध्ये १५ वर्षीय शफालीने रचला मोठा विक्रम


नवी दिल्ली – टी-२० क्रिकेटमध्ये भारताची युवा महिला क्रिकेटपटू म्हणून नावारुपास आलेली शफाली वर्माने मोठा पराक्रम केला आहे. सर्वात युवा भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी शफालीने मिळवला आहे.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात १५ वर्षीय शफालीने पदार्पण केले. पण, तिला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. गार्गी बॅनर्जीने जागतिक स्तरावरील टी-२० क्रिकेटमध्ये युवा महिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता.

शफालीने गार्गीनंतर या विक्रमात स्थान पटकावले आहे. शफालीने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे तिला भारतीय संघात स्थान दिले आहे. तिने सहा शतके आणि तीन अर्धशतकांसह १९२३ धावा केल्या आहेत. शफालीने महिला टी-२० चॅलेंजर स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती. तिने या स्पर्धेत नागालँडविरुध्द ५६ चेंडूत १२८ धावा चोपल्या होत्या. तिचे वय आणि कामगिरी पाहता भारतीय संघात पदार्पण हा शफालीसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.

Leave a Comment