जीमेल युजर्ससाठी गुगलचे स्पेशल गिफ्ट

डार्क मोड हे फिचर हळुहळु युजर्सला आवडू लागले आहे. काही दिवसांपुर्वीच iOS 13 मध्ये अपलने डार्क मोड हे फिचर दिले आहे. अँड्राइडसाठी देखील डार्क मोड आले आहे. आता जीमेलने आपल्या युजर्ससाठी डार्क मोड फिचर आणले आहे. गुगलने जीमेलसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले डार्क मोड अपडेट आणले आहे.

ज्या स्मार्टफोनमध्ये iOS 13 आणि iOS 10 आहे, त्यामध्ये कोणतेही बदल न करता जीमेल डार्क मोडचा वापर करता येतो. जीमेल ओपन केल्यावर तेथे डार्क मोड पर्याय दिसेल.

गुगलने म्हटले आहे की डार्क मोड ऑटोमेटिक ऐडजेस्ट होईल. गुगल पिक्सलफोनमध्ये जर तुम्ही बॅटरी सेव्हर वापरत असाल तर जीमेल आपोआप डार्क मोड होईल.

असे सुरू करा डार्क मोड –

जीमेलच्या सेटिंग्समध्ये जा. तेथे तुम्हाला Theme पर्याय दिसेल. यामध्ये तुम्हाला डार्क मोड दिसेल, जे तुम्ही सुरू करू शकता. जर तुम्हाला हा ऑप्शन दिसत नसेल तर, अपडेटनंतर डार्क मोड पर्याय तुम्हाला दिसेल.

गुगलने म्हटले आहे की, डार्क मोड एक्स्टेंडेट रॉल आउट अंतर्गत जारी करण्यात आले आहे. सर्व युजर्सला हे अपडेट मिळण्यासाठी 15 दिवस जातील. गुगलने हे जीमेलसाठी हे अपडेट अँड्राईड आणि ओएस दोन्ही युजर्ससाठी लाँच केले आहे.

 

Leave a Comment